"किती वेळ रे...मला पण ऑफिसला जायचंय. लेट होतोय"
ती बाथरूमच्या दरवाजावर चौथ्यांदा थाप मारत बडबडत निघून गेली. हातातली सकाळची कामं चालू होती.नुकतीच मुलांना बस मध्ये सोडून आली होती. मुलं नाश्ता करायला बसली तेव्हा हा अंघोळीला गेला होता. त्यांचं आवरून ही त्यांना बस मध्ये सोडून आली तरी हा बाथरूम मध्येच होता. म्हणून ती वैतागली .
दारावरची चौथी थाप ऐकून तोही वैतागला होता . दाढी करून आंघोळ करायला एवढा वेळ लागणाररच ना . हिला कटकट केल्याशिवाय काही करताच येत नाही . सकाळी उठल्यापासून हात आणि तोंड दोन्ही चालू . नको तिथे पण भुणभुण . वैताग नुसता ! चिडला होता तोही .
"काय झालं एवढं बोंबलायला ? आकाश कोसळलंय काय?" त्याने रागातच विचारलं .
"हो. कोसळणारच आहेत आज आकाश सर माझ्यावर. आज वेळेत गेले नाही तर तिसरा लेट मार्क लागेल, एक सी.एल जाईल. आणि आकाश सर बोंबा मारतील माझ्या नावाने..आता तू मारतोय्स तसा. जळलं मेलं! जिथे जावं तिथे मर मर कामं करून लोक बोंबलणारच आपल्या नावाने. ऑफिस मध्ये पण तेच आणि घरी पण तीच तऱ्हा."
"मग कामं कर ना फक्त स्वतःची. तोंडाचा पट्टा कशाला सोडतेस?"
"बरोबर. सकाळच्या घाईच्या वेळेत स्वतः एक तास बाथरूम एंगेज ठेवलंस..त्या बदल्यात माझ्या तोंडाचा पट्टा नाही तुला तर सोन्याचा कंबरपट्टा बक्षीस मिळायला हवा."
"शी!. तुलाच ठेव तो. दाढी करून अंघोळ करायला एवढा वेळ लागतो. पण तुला कशाला कळेल ते."
"हजार वेळा सांगिलताय, दाढी सिंक जवळ उभा राहून करत जा. दार लावून करायला तू काय तिजोरीतल्या पैश्यां सारखे दाढीचे केस मोजतोस का काढून झाल्यावर?"
" जा ग. तुझ्या तोंडाची चक्की कधी बंद होणार नाही. अशी घाण येत राहणारच त्यातून. जा आवर जा तुझं!"
" जाते. नाहीतर काय माझी कामं तू करणार आहेस? इकडची काडी तिकडे तरी करायची माहिती आहे का सकाळी? आयतोबा नुसता!"
ह्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला ही उशीर होत होता. आणि त्याला भांडण वाढवायचं नव्हतं. आणि कुठेतरी त्याच्या एका मनाने सांगितलंच " हे मात्र ही बरोबर बोलतीये हा!"
काय मदत करणार मी हिला? केर-बीर काढणं. भांडी घासणं आपल्याला शोभत नाही. भाजी-बीजी काय आपल्याला करायची सोडा, चिरता पण येत नाही. ही कामं आईनी कधी आम्हाला करावी लागतील याची जाणीव ही करून दिली नाही. मुलांचं काही करावं, तर त्यांना सगळ्या साठी ममाच हवी असते.
असो. हिची निरर्थक बडबड कधी संपणार नाही. कशाला विचार करून आपला आणखी वेळ घालवा?
त्याने पटापट तयारी केली. डायनिंग टेबल वर व्यवस्थित मांडून ठेवलेल्या एका प्लेट मध्ये नाश्ता वाढून घेतला. पटापट खाल्ला. आणि संवादासोबत वाद नको म्हणून तिच्याशी काहीही न बोलता निघून गेला.
ऑफिसला पोहचुन चहा घेऊन कमला सुरुवात केली. एक तासाची एक मिटिंग अटेंड केली. मिटिंगरूम मध्ये बाहेर पडताच बघतो तर त्याचे कोणीच मित्र जागेवर नव्हते. काचेच्या दरवाजातून बाहेर रिसेप्शन जवळच्या टी. व्ही जवळ त्याला घोळका दिसला.
कामं सोडून हे लोक तिथे काय करत आहेत? आज कुठली मॅच पण नाहीये. मग? विचार करत करत तोही काचेचा दरवाजा उघडून टी. व्ही जवळ पोहोचला. भयंकर बातमी होती. एल्फिन्स्टन रॉड आणि परळ स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी मार्गावर चेंगराचेंगरी झाली होती. प्रचंड गर्दीत ब्रिज कोसळल्याची अफवा कोणीतरी पसरवली आणि ही चेंगराचेंगरी झाली. २२ लोकांचा मृत्यू झाला असून २५-३० जण गंभीर रित्या जखमी झाली आहेत. टी.व्ही वरचे बातमीदार आपला काम करत होते. आणि तिथली दृश्य पाहून त्याच्या जवळची घोळक्यातली सगळी माणसं हळहळत होती, चुचकारत होती.
अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. ती पण रोज ह्याच ब्रिजने जाते. एल्फिन्स्टन वरून चर्चगेट ट्रेन पकडते. शप्पथ!!!! आता काय करावं? सुन्न झाला तो. पटकन मोबाईल बाहेर काढून तिचा नंबर फिरवू लागला. फोन वाजत होता एक सारखा. पण ती काही फोन उचलत नव्हती. अरे देवा! अडकली की काय ही पण त्या गर्दीत. त्या चेंगाचेंगरीत हिला काय झालं असलं तर? त्याला घाम फुटला ए सी मध्ये. त्यानं मित्राला बॉसला कळवायला सांगून, तसाच धावत सुटला. वाटेत किमान ५० वेळा तिचा फोन लावला. पण तिने काही उचलला नाही. त्याच्या मनातली शंकेची पाल आता पार मगरीएवढी मोठी झाल्या सारखं त्याला वाटलं.
स्टेशनला जायला रिक्षा मिळाली. पण वाटेत इतकं ट्रॅफिक होतं की अजिबात गाड्या हालत नव्हत्या. ठाणे ते परळ चालत तरी कसं जायचं. प्रचंड टेन्शन आलं होतं. देवा! हिला काही होऊ देऊ नको रे. सुखरूप ठेव ! मुलांचं कास होईल? आणि माझं? त्याला सकाळचं भांडण आठवलं त्यांच. उगाच भांडतो आपण तिच्याशी काही वेळा!
काय काय बोललो आपण तिला..तोंडाचा पट्टा काय, घाण काय! आपला पण आपल्यावर ताबा राहत नाही. बिचारी एवढं करते घरासाठी, मुलांसाठी, आपल्यासाठी. दमते. चिडते. आपण खरंच तिला समजून घेतो का? तिला आता काय झालं असलं तर आपण तिची माफी तरी मागू शकू का? आणि नाही मागता आली तर स्वत:ला कधी माफ करू शकू का?
जेमतेम स्टेशन गाठलं आणि त्याचा फोन वाजला. स्क्रीन वर तिचा फोटो आणि नाव पाहून त्याला क्षणभर इतकं बरं वाटलं की फोन उचलायचा पण त्याला सुचेना. पण भानावर येऊन त्याने ३-४ सेकंदांनी फोन उचलला.
" काय रे? एवहडे मिस्ड कॉल्स? काय झालं?
"तू पोहोचली का ऑफिसला ?"
' तिथे एल्फिन्स्टन ब्रिज ची बातमी पहिली टी. व्ही वर. म्हणून फोन करत होतो. बाकी काही नाही.' ही वाक्य गिळली त्याने. लगेच इगो बाहेर आला. काळजी आहे, पण दाखवायची नाही.
"हो. अरे एल्फिन्स्टन ब्रिज वर काहीतरी प्रॉब्लेम झाल्याच मैत्रिणीने कळवलं. म्हणून दादरला उतरून ट्रेन चेंज केली. तिथे माहिती आहे ना तिन्ही त्रिकाल मरणाची गर्दी. म्हणून फोन पर्स मधून बाहेरच काढता आला नाही.
त्याने क्षणभर डोळे मिटून देवाचे आभार मानले. आणि फोन ठेवला.
ती मैत्रिणीच्या आधाराने उठत ऑफिस मधल्या डॉक्टर कडे जाऊ लागली. त्या ब्रिजवरच्या धावपळीत तिच्या पायाला लागलं होतं आणि हाताला ही मुका मार बसून तो सुजला होता. कशी तरी ती एल्फिन्स्टन स्टेशन ला पोहोचली होती. माटुंग्याहून ट्रेन मधून येणाऱ्या तिच्या मैत्रिणीने तिला पाहिलं होतं आणि ती मैत्रीण तिला एल्फिन्स्टन वरून थेट टॅक्सी ने चर्चगेट ला घेऊन आली होती.
" अगं त्याला सांगितलं का नाहीस ? तो आला असता ना इथे." मैत्रिणीने न राहवून विचारलं"
" त्याला खूप टेन्शन आला असत ग. आणि जरी मी इकडे येण्यापासून थांबवलं असत तरी तो दिवसभर टेन्शन मध्ये राहिला असता. आणि इतकं कुठे लागलंय मला. २ दिवस सुट्टी घेतली की होईन बारी. मुलांना पण उद्या पर्वा सुट्टीच आहे. सो नो प्रॉब्लेम."
हे तिच्या दोन मुलं असलेल्या मैत्रिणीला कळायला अजिबात जड गेलं नाही.
-सुमेधा आदवडे